लिंगाणा! शिवछत्रपतींच्या लाडक्या रायगडाचा अंगरक्षक, बोराट्याच्या नाळेचा पहारेकरी, सह्याद्रीचा मूर्तिमंत रौद्ररूप धारण केलेला असा हा सुळकावजा किल्ला! जवळ जवळ ६५० फुटी शिवलिंगच जणू! समुद्र सपाटी पासून २९६९ फूट असलेला, गगनास …
Tag:
Lingana
लिंगाण्याच्या पहिल्या प्रस्तरला मी भिडलो. माझा आवाज ऐकताच सम्याने दोर खेचून घट्ट केला. हार्नेसवर ओळखीचा ताण जाणवू लागला आणि पहिले प्रस्तरारोहण करण्यास मी पाऊल टाकले.
माझ्यासाठी लिंगाणा आता एक पर्वत उरला नव्हता. तो एखादा सुळका, एखादा किल्लादेखील नव्हता. तो होता एक अत्यंत उग्र तपस्वी!
अचानक डोळ्यांसमोर आला तो लिंगाण्याचा बुलंद सुळका! मनात त्याचा चढ स्पष्ट दिसू लागला. तेथील प्रत्येक कातळ टप्पा नजरेत येऊ लागला!
नजर भिडली ती त्या हुकलेल्या शिखराला. मनातल्या मनात स्वतःलाच लाखोली वाहिली! त्याच्याकडे बघत मनोमन एक निश्चय केला.आपण परत यायचं! परत चढाई करायची! आणि ह्या वेळी ती यशस्वी करून दाखवायची!