लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती!

पूर्वार्ध

by Pranjal Wagh
165 views
पाने गावातून दिसणारा, आकाशात चढलेला लिंगाणा किल्ला!

२६ जानेवारी २०१३ ह्या दिवशी समीर पटेल, रोहन  शिंदे, Christian Spanner आणि मी लिंगाणा सर करून अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण केले! ह्या पूर्वी एक अयशस्वी प्रयत्न आम्ही केला होता. ही गोष्ट त्या दोन्ही प्रसंगांची आहे, लिंगाण्याने दिलेल्या धड्यांची आहे! सह्याद्रीत लागणारी मनाची आणि शरीराची कसोटी आणि ह्या सह्याद्रीने अचानक ओढवलेले प्रसंग हाताळण्याचे दिलेलं बळ ह्याची एक नगण्य परतफेडच जणू!
सांगण्यासारखे खूप काही असल्यामुळे ह्या लेखाचे ३ भाग करीत आहे! पण तत्पूर्वी खाली पूर्वार्ध देत आहे. पुढील भाग येतीलच!
अभिप्राय जरूर कळविणे!

– प्रांजल वाघ
————-

… आणि मग ठिणगी पडलीच!

१७ फेब्रुवारी  २०१२

“राहुल, आणखी किती वेळ लागेल शिखर गाठायला?”
“अरे गुहे पासून पुढे २ – २.५ तासाची चढाई आहे – कमीतकमी! अन त्यात बाकी ६ लोकं  खालच्या पॅच वर आहेत अजून!”

संभाषण होतं रोहन शिंदे (लीड) आणि राहुल खाचणे (सेकंड मॅन) ह्या दोघांमधील. मी थर्ड मॅन होतो. लिंगाण्याच्या गुहेजवळ पोहोचताच माझ्या कानावर हे शब्द पडले अन मनात शंकेची पाल चुकचुकली!

संध्याकाळी ६ वाजता लिंगाण्याच्या गुहेपाशी मी, रोहन अन राहुल उभे होतो. बराच उशीर झाला होता. माथा गाठायला अजून निदान अडीच तासाची चढाई बाकी होती. ह्यात आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे समीर पटेल आमच्या ५ सहकार्यांना घेऊन  खालच्या स्टेजला होता. त्यांना वर घेऊन येणे आणि मग माथा गाठणे निव्वळ अशक्यच!

मग मागे फिरायचे का? छे!

मागे फिरायला का इथपर्यंत चढून आलो? असं पराभूत होऊन परत फिरण्यासाठी? मग आम्ही दुसरे पर्याय शोधू लागलो. लगेच लिंगाण्याची गुहा डोळ्यासमोर आली! अरे, इथे राहता येईल की! बाकी ६ लोकांना वर घेऊन यायचं, रात्र इथे काढायची अन सकाळी परत चढाई!

रात्र काढणे इथपर्यंत ठीक पण जेवणाचं  काय?आत्मविश्वासाने की अती शहाणपणाने ठाऊक नाही पण आम्ही सामान तर २५० फूट खाली खिंडीत ठेवलं होतं! अन त्यातच आमच्या पोटपुजेचं तुटपुंज साहित्य!

साऱ्या विचारा अंती आमच्या पुढे एकच मार्ग उरला होता!

आता मागे फिरणे अपरिहार्य होते!

मला आजही ती रात्र स्पष्ट आठवते. फेब्रुवारी मधली बोचरी थंडी आणि कपड्याच्या आरपार जाणारा वारा. लगेचच पडलेला अंधार, उतरताना नसलेला हेडलाईट आणि ह्या सगळ्यात भर म्हणजे माझ्या हार्नेसला लटकलेला ८ लिटरचा पाण्याचा कॅन! धडपडत, ठेचा खात, तहानल्या भुकेल्या अवस्थेत रात्री ११:३०  वाजता खिंडीत आमचे सगळ्यांचे थकलेले जीव येउन पोहोचले.
उरल्या सुरल्या जेवणाचा फडशा पाडला व मेल्यागत उघड्यावरच थंडीत कुडकुडत झोपी गेलो. योग्य नियोजन आणि वेळेचं महत्व त्या दिवशी लिंगाण्याच्या धारेवरून उतरताना सह्याद्रीच्या बोचऱ्या वाऱ्याने आणि मिट्ट अंधाराने एका अविस्मरणीय पद्धतीने पटवून दिलं!

सकाळी खिंड सोडली आणि पाने गावात उतरलो. मागे लिंगाणा उभा होता – गगनाला भिडलेला!अभेद्य आणि बेलाग!

कदाचित आमचा हास्यास्पद पराभव पाहून त्या युगानुयुगे शांत उभ्या असलेल्या दुर्गाला हसू देखील आलं असेल.

नजर भिडली ती त्या हुकलेल्या शिखराला. मनातल्या मनात स्वतःलाच लाखोली वाहिली! त्याच्याकडे बघत मनोमन एक निश्चय केला.

आपण परत यायचं! परत चढाई करायची! आणि ह्या वेळी ती यशस्वी करून दाखवायची!

काल पराभूत झालेलो आम्ही पुन्हा पेटून उठलो! पाने गावातून निघताना आमच्या मनात एक नवीन ध्येय जन्माला आलं होतं! ठिणगी पडली होती!

लिंगाणा सर झालाच पाहिजे!

किसी भी कीमत पर !!

(क्रमशः)

– प्रांजल वाघ ©

(भाग १ इथे वाचा)

Instagram: @sonofsahyadris

Facebook : Son Of Sahyadris

छायाचित्र साभार :  प्रांजल वाघ

Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.

This means that you must attribute the work in the manner specified by me in a proper manner – for example – a link back to the content which you used as the source (but not in any way that suggests that I endorse you or your use of the work).

This also means that you may not use this work for commercial purposes and you may not alter, transform, or build upon this work. Click the link above to read the full license.

10 comments

Dhruva October 11, 2013 - 8:45 PM

Waghya Best suruwat

keep em coming 🙂

Reply
Pranjal Wagh October 11, 2013 - 11:42 PM

Dhanyawad Dhruva!

Reply
लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती! (भाग १) | A Rational Mind October 14, 2013 - 2:28 AM

[…] पूर्वार्ध इथे वाचा […]

Reply
Snehal Patil November 14, 2013 - 10:59 AM

कमाल अनुभव आहे पुढच्या पोस्ट साठीची curiosity पण आहे लवकरच कळवा

Reply
Pranjal Wagh December 1, 2013 - 11:12 PM

स्नेहलजी

मी आपला आभारी आहे!

Reply
आरोहण!! | A Rational Mind February 3, 2014 - 12:13 AM

[…] ही संपूर्ण शृंखला इथे वाचा पूर्वार्ध – …आणि मग ठिणगी पडलीच ! भाग १ – आरंभ!! […]

Reply
Swapnil Potdar February 3, 2014 - 2:49 PM

Nicely written. Eagerly waiting for next part.

Reply
Pranjal Wagh February 5, 2014 - 2:08 AM

Dear Swapnil,

Thank you for the appreciation!
Please find the entire series at the link given below!
Do read and express your views!

All Articles here : https://www.rational-mind.com/category/%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/
Thanks!!

Regards,
Pranjal Wagh

Reply
प्रविण नाचरे June 17, 2023 - 4:16 PM

माझा राहीला आहे

Reply
Pranjal Wagh June 18, 2023 - 1:07 AM

करून ये!! आता तर जत्रा भरते तिथे! 😉

Reply

Leave a Comment

You may also like