
गिर्यारोहण क्षेत्रातले द्रोणाचार्य श्री अरुण सावंत! (छायाचित्र – सुदेश रेणुसे)
ज्यांच्या असंख्य शिव्या खाल्ल्या, प्रेमाचे कोटी कोटी शब्द आणि शाबास्कीच्या पाठीवर थापा मिळवल्या, ज्यांच्यामुळे सह्याद्रीत काही वेगळे करता येते याची जाणीव झाली, जो जगण्याचे धडे देऊन गेला अशा या गुरूस अर्पण…
मेणाहूनि मऊ | वज्राहुनी कठोर |
ऐसाचि असे | गुरु अमुचा थोर ||
अवघड वाटेवर जाण्या | न धजे जिथे वारा|
सहज तिथे पोहोचूनि | धुंडाळिला मुलुख सारा||
मनसुबे तयाचे भव्य | फत्ते करूनच राही|
दृष्टी दिव्य तयाची | कुणा लाभली नाही ||
स्वयंप्रकाशी हा तारा | मग्न उदात्त कार्यात |
नसे कुणाच्या मध्यात | सदैव सह्याद्रीच्या सान्निध्यात||
दगडाच्या देशातून | घडविली राकट रत्ने|
देउनी गेला सह्यवसा | करुनि अनंत यत्ने ||
व्यसन असे डोंगराचे | म्हणुनी जो निरोगी |
नसे केवळ साहसवीर | हा साक्षात पर्वतयोगी ||
अखेर डोंगराचे आश्रयास | जावोनि विलीन झाला |
तेजाळूनि क्षितिजे तो | भेदूनि सूर्यमंडळे गेला ||
अरुणाप्रमाणे प्रखर | मित्रासम लावे माया |
सदैव तळपत आहे | आमची पाठराखण कराया ||
निघू जेव्हा डोंगराकडे | करीत सह्यनामाचा गजर |
आम्हावर राहील सदा | तयाची करडी नजर ||
भटक्या म्हणे अधिक | आता बोलवत नाही |
गुरूने दाखवली वाट | विशेष करावे काही ||
-प्रांजल वाघ
20 जानेवारी 2020
#अरुणसावंत
#ArunSawant
2 comments
Nice
आभारी आहे !!