अगदी परवाचीच गोष्ट!
आय पी एल ची कुठलीशी फडतूस Match पाहत बसलो होतो. सगळे कुटुंबीय एकत्रित होऊन Match पाहण्यात गुंग होतो!
घराचा दरवाजा तसा उघडाच होता. Strategic Time-Out चालू असताना पाणी प्यायला उठलो न तोंडचे पाणीच पळाले !
आमच्या नकळत ५-६ चीनी मंडळी घरात येउन बसली होती ! दरवाजातून मोजून १० पावलं !
इचिभन!! हे काय नवीन आता?
मी म्हटलं त्यांना, ” आहात कोण तुम्ही? आणि आमच्या घरात काय करताय? कोणाला विचारून आत आलात?”
त्यांचं सरळ उत्तर आलं, ” आम्ही कुठे तुमच्या घरात आहोत? आम्ही आमच्याच जागेत बसलो आहोत!” (उत्तर चीनी भाषेत आले असले तरी मी तुमच्या सोयीसाठी भाषांतर करून सांगतोय! अती शहाणा आहे ना मी! मला सगळ्या भाषा येतात!)
“कसं शक्य आहे? सरळ सरळ दरवाजा उघडा असलेला पाहून आत येउन बसता? ते पण मोजून १० पावलं? अन वर तोंड करून मलाच सांगता ही तुमचीच जागा म्हणून? ताबडतोब जागा खाली करा नाहीतर धक्के मारून बाहेर काढेन!”, माझ्या डोक्यात आता क्रिस गेलचं तांडव सुरु होणं फक्त बाकी होतं
इतक्यात आमची होम मिनिस्टर पचकली , “Please don’t be aggressive with them! आपण हा प्रॉब्लेम Flag Meeting ने सोडवू! शांततेने प्रत्येक प्रॉब्लेम सोडवता येतो! अहिंसा परमो धर्मः!” अशी सणसणीत संस्कृतयुक्त गांधीवादी ताकीद होम मिनिस्टरकडून मिळाल्यावर डोक्यातल्या क्रिस गेल नामक बोका कोपऱ्यात जाऊन हिरमुसून बसला. आमच्या गुरगुरण्याकडे थोडीच कोणी लक्ष देतं ?
अन मग आम्ही त्यांना Flag Meet साठी आमंत्रण पाठवलं. त्यांनी ते सरळ फेटाळून लावलं. “आम्ही आमच्याच जागेवर बसलोय, मिटिंगचा प्रश्न येतोच कुठे?”
आत्ता?!! पाहुणे ऐकायला तयार नाहीत! करायचं काय?
मग होम मिनिस्ट्री कडून आदेश आला! “व्हा बाजूला! सांगितलेला एक काम कधी जमेल तुम्हाला तर शप्पथ! सगळं मलाच करावं लागणार नेहमी प्रमाणे!” मग आमची काय बिशाद बोलण्याची? Madamचा आदेश पाळलाच पाहिजे!!
मग तिने माहेरून आणलेल्या गांधीबाबाच्या फोटोला नमस्कार केला. अन मग चक्कं त्या चीनी माकडांना जीव तोडून विनंती केली! अगदी कळवळून! हे रूप तर मला नवीनच होतं! एरवी ही भूमिका आमची असते! नवरा Proposes , बायको Disposes!!
जाऊ दे झालं !
तर जादू अशी झाली की गृहमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन (की टाईमपास करण्याच्या दृष्टीने?) ती चीनी झुरळ चर्चेला तयार झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी बैठक ठरली. (ह्या बैठकीमुळे सकाळी सकाळी न मागता चहा मिळाला ही एक चांगली गोष्ट!)
आमच्या तर्फे बोलणी मी चालू केली. सरळ मुद्द्यालाच हात घातला, ” जागा कधी खाली करताय?” , मी चहामध्ये मारी बिस्कीट
बुडवत बुडवत निळू फुले स्टाइल सवाल केला.
“आम्ही काही कुणाच्या घरात घुसखोरी केली नाही! आम्ही आमच्याच जागेत बसलो आहोत! जागा खाली करायचा प्रश्नच येतो कुठे?”
च्या मारी! चहात मारी बिस्कीट पडलं ! मारी बिस्कीटचा अंत तर झालाच , माझ्या सहनशक्तीचा अंत देखील आता जवळ येत होत. मी वैतागून उठून गेलो. चहा तसाच राहिला…
हा पेच कसा सोडवायचा हा विचार करत खिडकीत उभा रहिलो. समोर फेसाळलेला अरबी समुद्र दिसत होता. प्रत्येक लाटेसोबत माणसाने फेकलेला कचरा तो किनार्यावर आणून सोडत होता. समुद्र इतका विशाल तरी त्याला नको असलेल्या गोष्टी तो सदैव बाहेर फेकत अस्तो.
मग आपण पण तेच केला पाहिजे!
होय!
ह्या घुसखोरांना आपण सुद्धा बाहेर फेकून दिले पाहिजे!
पण कसे?
अचानक गृहमंत्र्यांचा आदेश आठवला – अहिंसा परमो धर्मः !
अन डोक्यात लख्खं प्रकाश पडला. लहानपणी बाबांनी (जबरदस्ती) गिरवून घेतलेले संस्कृतचे धडे आठवले! अन हा पूर्ण श्लोक आठवला,
अहिंसा परमो धर्मः ।
धर्म हिंसा तथैव च ॥
लहानपणी नको वाटणाऱ्या देववाणीने आज प्रकाश दाखवला होता! त्या काळी न कळलेला अर्थ आज उमजला होता!
अहिंसा हा निश्चित परम धर्म आहे! त्यात काहीच शंका नाही पण वेळ पडेल तिथे धर्मासाठी आणि सत्यासाठी हिंसा करावीच लागते! ती तितकीच महत्वाची आहे! अत्याचार जिथे होतो तिथे तो थांबविण्यासाठी प्रत्याचार हा व्हावाच लागतो!!
पण लहानपणापासून सतत अहिंसेचं महत्व मनावर बिंबवले गेले होते कि कुठेतरी प्रतिकार करणे मी विसरून गेलो होतो! कुठेतरी स्वतःच्या हक्कासाठी लढणेच आम्ही विसरून गेलो होतो! कुणा एका महात्म्याची शिकवण आमच्या मनात इतकी भरवली गेली होती कि आपोआप इतर महापुरुषांचा विसर पडला होता!
ह्या माकडांना आता धडा शिकवलाच पाहिजे असा मनाशी निर्धार करून मी माघारी वळलो. आत गेलो. कपाट उघडले. आत एका कोपर्यात विस्मरणात गेलेली काठी होती. फार वर्षांपूर्वी महाबळेश्वरला घेतलेली. काठीला स्पर्श करताच तुकोबांचा संदेश आठवला ,
भले ते देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
मेणाहुनी मऊ असलेल्या विष्णुदासाने कठोर होण्याचा संदेश दिला होता! पण अजुनही हे काम स्वतःच करावे हे पटत नव्हते.
“सिक्युरिटीला द्यावे का हे काम?” ह्या विचारात असताना कपाटात एक पुस्तक आढळले. त्यावर भगवे वस्त्र परिधान केलेले एक बलदंड, बलवान व्यक्तिमत्व उभे होते! अन पुस्तकावर शब्द होते – जय जय रघुवीर समर्थ।।
डोळ्यात जळजळीत अंजन घालावे तसे समर्थ रामदासांचे शब्द कानी पडले ,
स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपुला रणी वा मरावे |
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धाऊन येई ||
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि रक्त सांडल्याशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही हे मी कळून चुकलो! काठीवरील पकड घट्ट केली अन निर्धार केला – काहीही झालं तरी ह्या चीनी माकडांना इथून हाकलून लावायचं! आपल्या घराचं रक्षण जर करायचं असेल तर शेजारी नाही येणार मदतीला! पहिलं पाऊल आपल्यालाच उचलावं लागतं!
अंगात एक वेगळीच उर्जा संचारली होती ! मी तसाच निघालो – त्वेषाने ठाण मांडून बसलेल्या “चीनी बंधूंवर” लाठी प्रहार करत तुटून पडलो! हवा कापत काठी फिरत होती आणि एकेका घुसखोराच्या टाळक्याचा वेध घेऊन आपला निशाणा साधत होती! प्रत्येक आघात होताच त्यांच्या किंकाळ्या उठत होत्या! प्रतिकार तर त्यांनी देखील केला पण मी आता जुमानीत नव्हतो, जोश काहीसा अनावर झाला होता. बहुतेक आपल्या हतबलपणाची आणि सदैव शांततेचा मार्ग स्वीकारल्यामुळे झालेल्या हानीची भरपाई मी करत होतो!
काही सणसणीत फटके योग्य ठिकाणी बसल्यामुळे ती मंडळी आरडा-ओरडा करीत बाहेर पळाली. दरवाज्याच्या उंबरठ्यावर मी उभा राहिलो. ते लोकं पाठीला पाय लावून पळत होते. छाती धपापत होती आणि उर अभिमानाने भरून आला होता!
ते परत यायला नकोत म्हणून दरवाजा नीट बंद केला! पंखा लावला, खुर्चीत बसलो न डोळे मिटले, आपोआपच मनात विचारचक्र सुरु झालं. ह्या घुसखोरांना पळवून लावले तर खरे पण मार्ग कुठला योग्य मानावा? अहिंसेचा मार्ग इथे फसला पण तो नेहमीच फसतो असं नाही! हिंसेचा आधार घेऊन इथे स्वरक्षण केले पण नेहमीच हिंसा ही योग्य नाही!
मग मार्ग निवडावा कोणता? विचार कोणाचे मान्य करावे?
अन मग अंधार चिरून जसा एक प्रकाशाचा झोत येतो तसं उत्तर सापडलं! विचार कोणाचेच त्याज्य नाहीत! प्रत्येकाचे विचार योग्यच आहेत पण त्या विचारांना देखील परिस्थितीने घातलेली मर्यादा असते. कारण ते विचार एका माणसाचेच असतात अन परिस्थिती माणसं घडवते! मग हे सारे विचार आपण मानायचे अन वेळ पडेल तेव्हा शांततेने वागायचे अन वेळ पडलीच तर शस्त्र हाती धरायचे!
– प्रांजल वाघ ©
PS: The article was first started in the dying days of April when the Chinese Soldiers strolled 10km into Indian Territory for a weekend camping trip that turned out to be quiet a long vacation!
Special Thanks To
- The Indian Government and the Chinese Military for providing me with this content!
- Onkar Oak for his invaluable inputs on the article!
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.
This means that you must attribute the work in the manner specified by me in a proper manner – for example – a link back to the content which you used as the source (but not in any way that suggests that I endorse you or your use of the work).
This also means that you may not use this work for commercial purposes and you may not alter, transform, or build upon this work. Click the link above to read the full license.
8 comments
jhakasch lihilays
Dhanyavaad re mitra!
Itkya lavkar kon comment karel asa vichar pan kela navhta! 🙂
Hi Pranjal…
Tu nehmich mast lihitos. Tya panchewalyachya mage lagun “अहिंसा परमो धर्मः” mhanat apale lok wahawat gele ahet.
“धर्म हिंसा तथैव च॥” yacha visar padala ahe he apal durdaiv ahe…
—
Shrinivas
Hahaha…
Dhanyawad!!
Mala hi mahiti nuktich kalli ahe…Bauddha Bhikshu he ahimseche pujari hote pan tyanchi raksha karnyasathi tyanna Kalaripayattam cha hand to hand combat version shikavla gela! Tyachach pudhe prasar China-Japan hya pradeshat jhala….Aaj tyala Kung-fu ,Karate asa mhantat.
Point here is : Ahimsa jar havi asel tar ticha rakshan karayla himsa lagtech!
masta lihila ahes! pan jitka message powerful vatla titki gungavnari goshta nahi vatli. but the flow was amazing 🙂 keep more coming!!
Thanks Darshan!!
Tujha Spasht mat avadla!! Sahasa itki spasht comment yet nahi!
I will keep this in mind for future articles!
मस्त लिहिलं आहेस.
विचार करायला लावणारं आहे.
पण खरं सांगायचं तर मी नव्या कारगिलची तयारी मनोमन केव्हाच केली आहे. 🙁
Dusra Kargil?
Aata Dusra, Tisra, Chautha pan Kargil ghadu shakta mitra!
Tasehi deshachya potat Dusri pakistana janmu lagli ahet!